Shree Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र |

Shree Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र |

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः ।
गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

गुरु ब्रह्मा – गुरू ब्रह्मा आहे, जो सृष्टीचा स्वामी आहे, ज्याला निर्माता देखील म्हटले जाते, गुरू विष्णू म्हणजे गुरु विष्णू (विष्णू हा परमेश्वर आहे ज्याला संयोजक म्हणतात), गुरु देवो महेश्वरः म्हणजे गुरु महेश्वर (शिव किंवा संहारक) आहे , गुरु साक्षात् परब्रह्म म्हणजे परब्रह्म उदा. सर्वोच्च देव किंवा सर्वशक्तिमान. गुरू हा प्रकाशाच्या मार्गाकडे नेणारा असल्याने गुरु हा परब्रह्म आहे. तस्मै श्री गुरुवे नमः याचा अर्थ आपण त्या गुरूला प्रणाम करतो ज्यांचा पूर्वी उल्लेख केला आहे.

 

।। श्री स्वामी समर्थ ।

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।

अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

 

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

 

उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।

जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

 

खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।

आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

 

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंच प्रानामृतत।

हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।५।।

Leave a comment